कासावांचं घर

You are currently viewing कासावांचं घर

कासावांचं घर

कोकणातलं घर म्हणजे शेणाने स्वच्छ, सुबक सारवलेलं अंगण, त्यावर घातलेला मांडव, ओटी, पडवी, त्यावर झुलणारा झोपाळा, पलिकडे स्वयंपाकघर, मागच्या अंगणात मांडलेली चूल हे असं सगळं त्यात आलं. असं हे घर अगदी प्रत्येकाच्या मनात असत.

कोकणातल्या अशा पारंपरिक घरात गेलेलं बालपण नव्याने उजळवण्यासाठी, अशा घरांची मजा अनुभवण्यासाठी शांत, प्रसन्न असं turtle nest homestay तुमच्या स्वागताला सज्ज आहे; आणि सोबत आहे तितक्याच प्रेमळ आणि आपल्या अशा मोहन उपाध्ये यांची.

turtle hatchlings moving towards sea

गेली २२ वर्ष कासव संवर्धनासारखं महत्त्वाचं काम मोहन उपाध्ये हे तन-मन-धन अर्पून करत आहेत. उपाध्ये हे वेळासच्या प्रसिद्ध कासव महोत्सवासाठी आलेल्या पर्यटकांसमोर कासवाचा जीवन प्रवास तन्मयतेने मांडतात. त्यांच्या उत्तम बोलण्याच्या हातोटीमुळेच कासवांचा शास्त्रोक्त प्रवास मोठ्या रंजकपणे आपल्या डोळ्यासमोर उलगडतो. महत्त्वाचं म्हणजे आपणही त्या प्रवासाचा एक भाग होऊन जातो

कासव संवर्धना बरोबरच अनेक प्राणी, पक्षांची माहिती असलेले उपाध्ये तुम्हाला पक्ष्यांच्या नयनरम्य दुनियेची सैर करवून आणतात. आपल्या तीक्ष्ण नजरेने पक्षांना शोधत, त्यांच्याशी संवाद साधणा-या उपाध्यांमुळे आपल्यालाही नकळत पक्ष्यांची भाषा समजू लागते आणि मग अनेक अनोळखी पक्षांबरोबर ओळखीचे पक्षीही आपल्याला नव्याने उमगू लागताना मन अगदी पाखरू होऊन जातं.

शहरापासून दूर, शांत अशा वेळास मधल्या या turtle nest home stay मध्ये मन प्रसन्न होत असतानाच
उपाध्ये यांच्या बोलघेवड्या स्वभावामुळे, अगत्यशील सहवासाने जणू आनंदाचा खजिनाच गवसतो. जोडीला रुचकर भोजनाने आत्मा तृप्त होतो.

चार दिवस चेंज म्हणून आलेल्या आपल्याला मजा अनुभवतानाच कासवांच्या, निसर्गातल्या घटकांच्या, तिथल्या परिसराच्या शास्त्रोक्त माहितीने आणि त्याच्या अनुभूतीने आपली झोळी भरून जाते. कासवाशी, कासवाच्या गावाशी आपले ऋणानुबंध जोडले जाऊन आपण फिरून परत यायचा निश्चय करतो…अगदी त्या कासवांसारखाच…..

आमच्या प्रयत्नाना आणखी एक जोड म्हणून आम्ही ही वेबसाइट सुरू करत आहोत जिथे आपणास आमच्या होमस्टे बद्दल, कोकणातील घरांबद्दल, कोकणातील निसर्गाबद्दल आणि वेळास मधील कासव महोत्सवा बद्दल विविध गोष्टी वाचायला मिळाव्यात म्हणून प्रयत्नशील राहू. आमच्या वेबसाइटला नक्की भेट द्या आणि आपले विचार ब्लॉगच्या कमेन्ट मध्ये लिहायला विसरू नका.

खाली दिलेल्या लिंक पहा आणि आम्हाला फॉलो करा

ज्यांनी कोकणातील बालपण अनुभवलंय त्यांनी ते परत अनुभवायला आणि ज्यांना असं बालपण मिळालं नाही त्यांनी ते आत्ता अनुभवायला या! कोकणातल्या अशा पारंपारिक घरांची मजा, तिथली आपुलकी, त्यांचं आदरातिथ्य अनुभवायला वेळासला आमच्या ‘टर्टल नेस्ट होमस्टे’ ला नक्की या!

Leave a Reply